लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा | पुढारी

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न लता मंगेशकर या उपचारांना साथ देत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने रविवारी देण्यात आली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 16 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या उपचारांना साथ देत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.

 

Back to top button