Salami slicing : सीमेवरील चीनच्या कुरघोड्या ‘सलामी स्लाइसिंग’च्या प्रसाराचा भाग

Salami slicing : सीमेवरील चीनच्या कुरघोड्या ‘सलामी स्लाइसिंग’च्या प्रसाराचा भाग
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतआणि चीनच्या लडाख सीमेवर (LAC) सीमावाद अजुनही धगधगत असल्यामुळे तिथली परिस्थिती नाजूक झालेली आहे. संरक्षण तज्ज्ञ म्हणतात की, शेजारील देश एलएसीवर सीमाप्रश्नावरील तणाव कायम ठेवून भारताचा स्थायी शत्रू असल्याचे सिद्ध करत आहे. लडाखमध्ये सीमाप्रश्नवरील उपाय शोधण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चा झाल्या; पण त्यावर ठोस उपाय निघाला नाही. (Salami slicing)

२०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सीमाप्रश्नावरून जो वाद छेडला गेला आहे, तो अजुनही कायम आहे. सैनिकांना मागे जाण्यासाठी आणि इतर मुद्द्यांवर भारत आणि चीन यांच्या कमांडरस्तरीत चर्चादेखील सुरू आहेत. दोन्ही देशातील सैनिक एलएसीवर एकमेकांसमोर उभे आहेत. याच दरम्यान चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अरुणाचल प्रदेशमधील एक अल्पवयीन मुलांचा अपहरण करून वाद आणखी चिघळत ठेवला.

संरक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, "पूर्वी लडाखमधील स्थिती जशीच्या तशीच आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून भारताच्या सीमांवर अंतर्गत अतिक्रमण दृढ करत आहे. त्यामुळे भारत सध्या प्रतिकूल परिस्थितीत आहे. आता भारताला चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या वाढत्या कुरघोडींना लगाम घालण्यासाठी रणनिती बनवावी लागेल. आपल्या सैन्य क्षमतेमध्ये वाढ करावी लागेल."

गलवान खोऱ्यात आजदेखील स्थिती नाजूक आहे. असं असलं तरी, कोरोनाकाळात दोन्ही देशांकडील व्यापार वाढतच आहे. त्यामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सल्लागार प्रोफेसर ब्रह्म चेलानी म्हणाले की, "चीनकडून वादग्रस्त परिसरात सैन्यांचे गाव वसविल्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करणं, हा प्रकार म्हणजे चीनचा सलामी स्लाइसिंगच्या (Salami slicing) रणनितीचा प्रसार आहे.

एखाद्या देशाकडून आपल्या शेजारील राष्ट्रांच्या सीमेवरील भूभागावर सैन्यांद्वारे नियंत्रण मिळवणे, या सलामी स्लाइसिंग म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्पती शी जिनपींगच्या १८ वेळा भेटी घेतल्या, तरीही चीनचं अतिक्रमण सुरूच आहे. त्यामुळे भारताचा स्थायी दुश्मन चीन कायमच राहील, असं वारंवार सिद्ध झालं आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील स्थानिक लोक वारंवार तक्रार करीत आहेत की, "चीन मीटर न् मीटर आणि मैलो न् मैल आमच्या पारंपरिक चारा असणाऱ्या जागांवर अतिक्रमण करत आहे. सीमाभागांवर सैन्याची गावं वसवली जात आहे."

काही दिवसांपूर्वी सीमावादावरून भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये १४ वी चर्चा बैठक झाली. त्यामध्ये कोणतंच यश मिळालं नाही. मात्र, दोन्ही पक्षांकडून मुत्सद्दी चर्चेतून संबंध व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर उपस्थित प्रश्नांवर लवकरच दोघांचं एकमत होईल, अशा पद्धतीची चर्चा होईल, असंही सांगितलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news