लंडन : तब्बल 60 कोटी वर्षांपर्यंत मंगळावर लघुग्रहांचा वर्षाव | पुढारी

लंडन : तब्बल 60 कोटी वर्षांपर्यंत मंगळावर लघुग्रहांचा वर्षाव

लंडन : आपल्या सूर्यमालेची निर्मिती कशी आणि कधी झाली? हा एक खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. यामुळेच याबाबत आजपर्यंत असंख्य संशोधने करण्यात आली आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार सूर्यमालेच्या इतिहासात अशी एक वेळ आली होती की, तेव्हा पृथ्वी आणि ग्रहांवर मोठ्या प्रमाणात लघुग्रह अथवा उल्कापिंडांचा वर्षावर झाला होता. दरम्यान, पृथ्वीवर इतके पाणी उल्कापिंडांमुळेच आले, असेही एका संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘न्यू कर्टन युनिव्हर्सिटी’च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार, लालग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळावर 60 कोटी वर्षांपर्यंत सातत्याने लघुग्रह अथवा उल्कापिंडांचा वर्षाव झाला होता. या खगोलीय पिंडांच्या धडकेमुळेच मंगळावर असंख्य क्रेटर्स बनले आहेत. हे खगोलीय पिंड प्रचंड वेग व सातत्याने मंगळावर धडकत होते. हे संशोधन ‘अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Mars
लंडन : तब्बल 60 कोटी वर्षांपर्यंत मंगळावर लघुग्रहांचा वर्षाव

या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी एक क्रेटर डिटेक्टर एल्गॉरिदम तयार केला. प्रमुख संशोधक डॉ. लॅगेन यांनी सांगितले की, या एल्गॉरिदममुळे आम्हाला क्रेटर्सवर झालेल्या परिणामांची माहिती मिळते. यामध्ये कोणत्या आकाराचा खगोलीय पिंड धडकला? तसेच धडकेची वेळ आणि त्याची तीव्रता किती होती, याची माहिती मिळते. या माहितीच्या आधारे मंगळावर सुमारे 60 कोटी वर्षांपर्यंत खगोलीय पिंडांचा वर्षाव झाला होता. या पिंडांच्या धडकेमुळेच मंगळावर क्रेटर्सची निर्मिती झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात असेच संशोधन अन्य ग्रह आणि चंद्राबाबत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button