सामंथा रुथ प्रभू हिची लक्झरी लाईफ; या गोष्टींतून मिळवले कोट्यवधी रुपये - पुढारी

सामंथा रुथ प्रभू हिची लक्झरी लाईफ; या गोष्टींतून मिळवले कोट्यवधी रुपये

पुढारी ऑनलाईन

साऊथ सुपर अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha) ची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरज नाही. ती साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आता ती लवकरचं बॉलीवूडमध्ये पदार्पण करायलाही सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, सामंथा रुथ प्रभूने ६० हून अधिक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सामंथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. पण, काही मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले. सामंथाने इंडस्ट्रीत खूप कमी वेळेत नाव आणि प्रसिध्दी मि‍‍‍ळवलीय. तुम्हाला माहितीये का, घटस्फोटावरून चर्चेत राहणारी सामंथाकडे आज किती कोटींची संपत्ती आहे.

एकूण संपत्ती

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सामंथाची संपत्ती जवळपास ८० कोटी रुपये आहेत. तिने इतकी कमाई अभिनय, मॉडलिंग आणि ब्रँड एंडोर्स करून मिळवली आहे. ती इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. जेव्हा चॅरिटी आणि सोशल वर्क असतं, तेव्हा सामंथा नेहमी पुढे असते. रिपोर्ट्सॉनुसार, सामंथा एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये घेते.

सामंथाचं लक्झरी घर

सामंथाचं हैदराबादमध्ये लक्झरी घर आहे. तिचं घर अन्न पूर्णा स्टुडिओ जुबली हिल्समध्ये आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये तिच्या प्रॉपर्टीज आहेत.

लक्झरी गाड्यांची हौस

सामंथाला लक्झरी गाड्या खूप आवडतात. तिच्याकडे बीएमडब्ल्यू ३ सीरीज, बीएमडब्ल्यू एक्स ५ आणि जॅग्वार गाडी आहे.

सामंथाचं करिअर

सामंथाने २०१० मध्ये चित्रपट या माया चेसवे मधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. यानंतर प्रत्येक वर्षी तिचे ३-४ चित्रपट रिलीज व्हायचे. ती एक उत्तम अदाकारा असण्यासोबतचं फॅशनइस्टा देखील आहे. आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे ती सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते. मग तो भारतीय पेहराव असो वा वेस्टर्न ड्रेस.

सामंथाने डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील पाऊल ठेवलं होतं. तिने वेब सीरीज द फॅमिली मॅन २ मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतली होती. या सीरीजमध्ये सामंथाच्या अभिनयाला दाद मिळाली होती.

Back to top button