Britain corona Update : मास्‍कची सक्‍ती असणार नाही, 'वर्क फ्रॉम होम'ही होणार बंद | पुढारी

Britain corona Update : मास्‍कची सक्‍ती असणार नाही, 'वर्क फ्रॉम होम'ही होणार बंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आणि ब्रिटनमध्‍ये ( Britain corona Update) मागील महिन्‍यात कोरोना निर्बंध लावण्‍यात आले होते. शास्‍त्रज्ञांना विश्‍वास आहे की, देशात यापूर्वीच ओमायक्रॉनच्‍या संसर्गाने उच्‍चांक गाठला आहे. संसर्ग कायम असला तरी गंभीर रुग्‍णांची संख्‍या आणि रुग्‍णालयात दाखल करण्‍याची संख्‍या कमी आहे. ब्रिटनमधील कोरोना प्रतिबंधक नियम लवकरच हटविण्‍यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्‍सन यांनी नुकतीच संसदेत केली. देशात लवकरच मास्‍क वापरची सक्‍ती असणार नाही. तसेच मंगळवारपासून वर्क फॉर्म होम बंद केले जाईल. तसेच शैक्षणिक संस्‍थांमध्‍येही मास्‍कचा वापर केला जाणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Britain corona Update :  सार्वजनिक ठिकाणी मास्‍कची सक्‍ती नाही

लवकरच नागरिक विनामास्‍क सार्वजनिक ठिकाणी फिरु शकतील. नागरिकांना बुस्‍टर डोस देण्‍यासाठीचा मोहीम राबवणे सुरु असून याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. उत्तर इंग्‍लंडमध्‍ये रुग्‍णसंख्‍या अधिक आहे. तसेच येथे अतिदक्षता विभागातील रुग्‍णांची संख्‍याही अधिक आहे. आता यापुढे आम्‍ही वर्क फॉर्म होमला बंद करत अहोत. तसच मंगळवारपासून प्रवासासाठीच्‍या कोरोना पासचीही आवश्‍यकत असणारनाही, असेही जॉन्‍सन यांनी सांगिले. सार्वजनिक ठिकाणी आणि शैक्षणिक संस्‍थांमध्‍येही मास्‍क अनिवार्य असणार नाही, असेही जॉन्‍सन यांनी स्‍पष्‍ट केले.

ब्रिटनमध्‍ये ६० टक्‍के लोकसंख्‍येने बुस्‍टर डोस घेतले आहे. त्‍यामुळे कोरोना संसर्ग झाला तरी आम्‍ही पाच दिवसांचे विलगीकरणही बंद करण्‍याच्‍या विचारात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कोरोना ही एक महामागरी आहे. त्‍यामुळे याला प्रतिबंध करण्‍यासाठीच्‍या नियमावलीत परिस्‍थितीनुसार बदल होणेही अपेक्षित आहेत, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button