पूजा हेगडे हिचे फोटोशूट करणारा फोटोग्राफर लकीच! - पुढारी

पूजा हेगडे हिचे फोटोशूट करणारा फोटोग्राफर लकीच!

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियात बरीच सक्रिय असते. स्वतःचे फोटो ती येथे शेअर करत असते. नुकतेच पूजाने मालदीवमध्ये केलेल्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. या बिकिनी फोटोशूटच्या फोटोंनी ऐन कडाक्याच्या थंडीत इंटरनेटरवरील वातावरण पूजाने ‘हॉट’ बनवले आहे. हे फोटो शेअर करत त्यासोबत पूजाने कॅप्शन लिहिली आहे की, ‘मैं हमेशा अपनी सनशाईन लेकर चलती हूँ.’ पूजाचे हो फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत.

पूजाला इन्स्टाग्रामवर 17 मिलियन फॉलोअर्स आहेत. हे फोटो अपलोड केल्यानंतर त्यांना लगेचच 12 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. विशेष म्हणजे, यावरील नेटकर्‍यांच्या कॉमेंट्सही मजेशीर आहेत. एकाने या फोटोशूटवर ‘लकी फोटोग्राफर’ अशी मिश्किल टिपणी केली आहे. पूजाच्या कामाबाबत बोलायचे तर तिच्या ‘राधे श्याम’ची रीलिज डेट पुढे सरकली आहे. नवी डेट अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय ‘बीस्ट’, ‘आचार्य’, ‘सर्कस’ या चित्रपटांत ती दिसणार आहे.

Back to top button