नितीश चव्हाण याची नवी पोस्ट चर्चेत; 'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय' - पुढारी

नितीश चव्हाण याची नवी पोस्ट चर्चेत; 'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय'

पुढारी ऑनलाईन

लागिरं झालं जी फेम नितीश चव्हाण याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याने आपला एक फोटोदेखील शेअर केला आहे. तो या फोटोत त्याने पांढऱ्या रंगाचा बोर्ड हातात घेतला आहे. त्या बोर्डवर लिहिलंय- ”आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकाय.” फोटोमध्ये नितीश चव्हाण याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसताहेत.

नितीशने फोटो पोस्ट करताना इन्स्टावर लिहिलंय-

मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशन बद्दल सांगितलं नाही कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं न्हवत; पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय.

या पोस्टनंतर त्याचे चाहते अनेक तर्क-वितर्क लढवत आहेत. काही सोशल मीडिया युजरनी त्याच्या या पोस्टवर खूप सारे कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हे एखाद्या मालिकेचे प्रमोशन आहे, असे म्हटले आहे. तर काहींनी त्याला तू काळजी करू नकोस, मी आहे, असा दिलासा दिला आहे.

इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांनी नितीशला काय काय कमेंट्स दिल्या आहेत पाहा-

अय भावा असं shocked नको देऊ खरं खरं सिरियल वगैरे येत असेल तर . ….😢🔥😍😂😂. मी आहे don’t worry. अरे आहेर द्यायचा होता आज्या लका 😀. नवीन पिक्चर… गाणं.. की सिरियल..??😄. film badal aahe ka. Nice advertising.
आणखी काही नेटकऱ्यांनी लिहिलंय-

भावा तू एवढा मोठा ॲक्टर आहेस, तुला कशा धमक्या येतील बरं, न्यू प्रोजेक्ट दिसतोय, पोरींना ॲटॅक येईल राव, सोयरीक का भावा, ते जाऊद्या पार्टी कधी देता लग्नाची ते सांगा🤔. किती मोटा निर्णय घेतला तू, भावा तू इंडियन आर्मीचा फौजी आहेस भितोस काय कोणाला. पूर्ण army force घेऊन येतो बोल तू फक्त, नवीन पिक्चर किंवा मालिका. आहे लवकर आपल्या भेटीला😂, कोना सोबत लग्न केलंय?

या सर्व गोष्टींनंतर नितीश खरचं एखाद्या मालिकेचं किंवा चित्रपटाचं प्रमोशन करतोय की काय, असं वाटत आहे. पण, नितीशकडून याविषयी कुठलाच खुलासा झालेला नाही. त्याची ही पोस्ट नेमकी कशासाठी आहे, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button