पुढारी ऑनलाईन डेस्क :
समाजवादी पार्टीचे ( सपा ) प्रमुख अखिलेश यादव निवडणूक रिंगणात उतरणार असून, ते मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी घोषणा समाजावादी पार्टीचे महासचिव राम गोपाल यादव यांनी आज केली.
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून आश्वासनांचा पाउस पडत आहे. समाजवादी पार्टीनेही आपल्या 'संकल्पपत्रात' दरवर्षी ३०० युनिट मोफत वीज, लॅपटॉप स्किम पुन्हा सुरु करणे, शेतकर्यांना मोफत वीज, आयटी क्षेत्रात २२ लाखांहून अधिक तरुणांना रोजगार आदी आश्वासनने दिली आहेत. आमचा पक्ष घरोघरी जावून प्रचारासाठी सज्ज झाला आहे. काही वृत्तवाहिनींनी केलेल्या सर्वेमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे म्हटलं आहे. खरंच भाजप आघाडीवर असेल तर या पक्षाचे सर्वांधिक आमदार पक्ष कशासाठी सोडत आहेत, असा सवालही यावेळी अखिलेश यांनी केला.
'एआयएमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये बाबूसिंह कुशवाह आणि भारत मुक्ती मोर्चाबरोबर आघाडी केली आहे. यावेळी ओवैसी यांनी घोषणा केली की, आमचे सरकार आल्यास उत्तर प्रदेशमध्ये दोन मुख्यमंत्री असतील. यातील एक ओबीसी असेल तर दुसरा हा दलित समाजातील असेल. त्याचबरोबर तीन उपमुख्यमंत्रीही केले जातील. त्यातील एक
मुस्लिम समुदायातील असेल, असेही ओवेसी म्हणाले.
हेही वाचलं का?