विजेता चित्रपट टीव्हीवर पाहता येणार ‘या’ दिवशी | पुढारी

विजेता चित्रपट टीव्हीवर पाहता येणार 'या' दिवशी

पुढारी ऑनलाईन

खेळण्यात जिंकण्याचा ध्यास महत्त्वाचा असतो. कारण संधी जरी प्रत्येकाच्या वाट्याला येत असली, तरी तिचं सोनं करणं हे ‘ज्याच्या-त्याच्या’ हातात असतं. जिद्द, परिश्रम, जिंकण्याची उर्मी आणि योग्य मार्गदर्शन ह्या सर्व गोष्टी खेळात जिंकण्यासाठी महत्त्वाच्या असतात. कारण जिद्दीने मैदानावर लढणाराच विजेता ठरतो. मैदानात याच जिद्दीने उतरलेल्या खेळाडूंवर आधारित विजेता हा चित्रपट रविवारी, २३ जानेवारी, २०२२ रोजी दुपारी १२. ०० वा. आणि सायं. ६. ०० वा. पाहता येणार आहे. हा चित्रपट झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई प्रस्तुत आणि अमोल शेटगे दिग्दर्शित हा चित्रपट नॅशनल ॲथलीट्सच्‍या जीवनावर  प्रकाश टाकतो. गावखेड्यांमधून येणाऱ्या या खेळाडूंचे मनोबल वाढवत देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमीची गोष्ट सांगणारी ही कथा अत्यंत प्रेरणादायी आहे.

दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाची जणू जुगलबंदीच ‘विजेता’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचक्के, प्रीतम कागणे, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेंद्र चौगुले, दिप्ती धोत्रे, कृतिका तुळसकर आणि गौरीश शिपुरकर या कलाकारांची दमदार फळी ‘विजेता’ चित्रपटात आहे.

आत्मविश्वास आणि प्रयत्न या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही गोष्टींचा मिलाफ साधणारी व्यक्तीच जीवन आणि मैदान दोहोंमध्ये विजयी ठरते.

हेही वाचलं का? 

Back to top button