Hingoli : औंढा नागनाथ नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा; तर सेनगावमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी पाच जागा | पुढारी

Hingoli : औंढा नागनाथ नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा; तर सेनगावमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी पाच जागा

औंढा नागनाथ/सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील औंढा नागनाथ नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 9 जागा जिंकून शिवसेनेने स्पष्ट बहूमत मिळविले आहे. मात्र, सेनगाव नगरपंचायतीमध्ये एकाही पक्षाला बहुतमापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी इतर पक्षालासोबत घ्यावे लागणार आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. हिंगोली (Hingoli) जिल्हयातील औंढा नागनाथ व सेनगाव नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.

औढा नागनाथ येथे शिवसेना सुरुवातीपासूनच आघाडीवर…

आज सकाळी दहा वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली होती. औढा नागनाथ येथे 17 जागांसाठी सुरु झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. संपूर्ण 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये शिवसेनेने 9 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. या ठिकाणी शिवसेनेला 9, काँग्रेस 4, भाजप 2, वंचित आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी विजयी उमेदवारांमध्ये शिवसेनेचे दिलीप राठोड, सपना कनकुटे, शितल पवार, राजू खंदारे, राहूल दंतवार, जया देशमुख, साहेबराव काळे, अनिल देव, मनोज काळे यांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये शेख गजाला बेगम, महमद आसेफ इनामदार, कुंताबाई गोबाडे, सुनीला जावळे यांचा समावेश आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारामध्ये शेख गोरोबी रशीद, रेश्मा महेमुद शफी यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या दीपाली पाटील, अश्विनी पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान, सेनगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा यांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या असून काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी बहुमतासाठी दुसर्‍या पक्षाचा आधार घ्यावा लागणार आहे. तीनही प्रमुख पक्षांना प्रत्येक पाच जागा मिळाल्यामुळे नेमके राजकिय गणित मांडणे कठीण झाले आहे.

विजयी उमेदवार…

या ठिकाणी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांमध्ये यमुनाबाई देशमुख, शिलानंद वाकळे, ज्योती देशमुख, शीलाबाई कोकाटे, निखील देशमुख यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांमध्ये गायत्री देशमुख, मनीषा देशमुख, शालीनी देशमुख, उषा मानकर, स्वाती बहिरे यांचा समावेश आहे. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये अमोल तिडके, अंजली देशमुख, राधा देशमुख, मीरा खाडे, प्रयागबाई फटांगळे यांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या विमलबाई गाढवे, ओमप्रकाश देशमुख यांनी विजय मिळविला आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा

Back to top button