South Actors : थलपती ते अल्लू अर्जुनपर्यंत महागडे आहेत ‘हे’ साऊथ स्टार्स | पुढारी

South Actors : थलपती ते अल्लू अर्जुनपर्यंत महागडे आहेत 'हे' साऊथ स्टार्स

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथ चित्रपटांचं राज्य संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीवर आहे. या स्टार्सच्या चित्रपटांवरदेखील उत्तर भारतातील दिग्दर्शकांच्या नजरा खिळल्या आहेत. महेश बाबू, प्रभास ते अल्लू अर्जुनपर्यंत या पुढील साऊथ स्टार्सवि‍षयी (South Actors ) छोट्या-छोट्या गोष्टीदेखील जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. सध्या साऊथ सुपरस्टार्सना मिळणाऱ्या रकमेची मोठी चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॉलीवूडचा प्रिन्स महेश बाबूने त्याचा चित्रपट सरकारू वारी पाटासाठी मोठी रक्कम घेतली आहे. रिपोर्टनुसार, महेश बाबू तिसरा हाएस्ट पेड अभिनेता झाला आहे. (South Actors )

प्रभास

Prabhas ने Radhe Shyam साठी घेतले इतके कोटी

समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, चित्रपट राधे श्यामसाठी साऊथ सुपरस्टार प्रभासने तब्बल १२५ कोटी रुपये घेतले होते. या लिस्टमध्ये तो टॉप पोझिशनवर पोहोचला आहे.

अल्लू अर्जुन

Allu Arjun ने Pushpa साठी घेतले इतके कोटी

अल्लू अर्जुनने नुकताच रिलीज झालेला चित्रपट पुष्पासाठी ७५ कोटी रुपये घेतले आहेत. याचसोबत तो दक्षिणेचा दुसरा सर्वात हाएस्ट पेड अभिनेता बनलाय.

महेश बाबू

Mahesh Babu इतकं घेतो मानधन

रिपोर्टनुसार, महेश बाबूने सरकारू वारी पाटा चित्रपटासाठी ७० कोटी रुपये घेतले होते. आता तो या यादीत तिसरा हाएस्ट पेड अभिनेता बनलाय.

विजय

Thalapathy Vijay ने Beast साठी कमी केले होते मानधन?

रिपोर्ट्सनुसार, थलापति विजयने बीस्ट या चित्रपटासाठी एकूण ६५ कोटी रुपये चार्ज केले होते. ही रक्कम पाहून हा प्रश्न उपस्थित होतो की, मास्टर स्टारने आपला चित्रपट बीस्टसाठी मानधन का कमी केले होते? याआधी थलापति विजयने मास्टरसाठी जवळपास ८० कोटी रुपये घेतले होते.

पवन कल्याण

Pawan Kalyan ने Bheemla Nayak साठी मागितली होती इतकी रक्कम

सूत्रांच्या माहितीनुसार, पॉवर स्टार पवन कल्याणने भीमला नायक चित्रपट ६५ कोटी रुपयांत साईन केला होता. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.

ज्युनिअर एनटीआर

Jr NTR ला मिळाली इतकी रक्कम

जेव्हा दिग्दर्शक एस एस राजामौलीचा चित्रपट आरआरआरसाठी अभिनेते ज्युनिअर एनटीआरलादेखील राम चरण या अभिनेत्यासोबतचं ५०-५५ कोटी रुपये घेतले होते.

रजनीकांत

Rajinikanth यांनी Annaatthe साठी घेतला इतक्या रुपयांचा चेक

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी चित्रपट अन्नाथेसाठी एकूण ५० कोटी रुपये घेतले होते.

विजय देवरकोंडा

Vijay Deverakonda ला Liger साठी मिळाली इतकी रक्कम

चित्रपट लायगरसाठी अभिनेता विजय देवरकोंडाने केवळ ३५ कोटी रुपये घेतले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

Back to top button