श्री अंबाबाईच्या मुखकमलाला सूर्य किरणांचा स्‍पर्श | पुढारी

श्री अंबाबाईच्या मुखकमलाला सूर्य किरणांचा स्‍पर्श

कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज किरणोत्‍सवाच्या चौथ्‍या दिवशी मावळतीला जाणाऱ्या सर्यकिरणांनी देवीच्या मुर्तीच्या सुवर्ण किरीटापासून ते चरण कमलापर्यंत सुवर्ण अभिषेक घातला. यावेळी सोनेरी सूर्य किरणांच्या प्रकाशात मुर्ती न्हाऊन निघाली. 

यावेळी काही वेळ ढगांचा आडथळा आला. मात्र काही वेळातच ढग बाजूला गेल्‍याने श्री अंबाबाईच्या मुर्तीपर्यंत सूर्याची किरणे पोहोचली. यावेळी पूर्ण क्षमतेने किरणोत्‍सव साजरा झाला. मध्यंतरी शहरातील इमारतींवरील होर्डीग्‍जमुळे श्री अंबाबाईच्या पारंपरिक किरणोत्‍सवात अडथळा येत होता. मात्र यंदा पूर्ण क्षमतेने किरणोत्‍सवाचा सोहळा विना अडथळा पार पडला. त्‍यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सूर्य किरणांचा प्रवास…

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्‍सव हा वैशिष्‍ट्यपूर्ण मानला जातो. आज सायंकाळी सूर्याची किरणे ५ वाजून ४४ मिनिटांनी महाव्दार कमानीजवळ आली. ५ वाजून १६ मिनिटांनी किरणे गरूड मंडपात पोहोचली. ५ वाजून ३३ मिनिटांनी किरणे कासव चौकात पोहोचली. ५ वाजून ३७ मिनिटांनी किरणांनी पितळी उंबऱ्यापर्यंत प्रवेश केला. यानंतर ५ वाजून ३९ मिनिटांनी किरणे चांदीच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचली. ५ वाजून ३९ मिनिटांनी किरणांचा प्रवेश गर्भगृहाच्या पायरीपर्यंत झाला. ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य किरणांनी देवीच्या चरणांना स्‍पर्श केला. ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे देवीच्या सूवर्ण किरिटांवर पोहोचली. ५ वाजून ५० मिनिटांनी सूर्य किरणे देवीच्या पूर्ण मुर्तीवर पडली. यामुळे यंदाचा किरणोत्‍सव पूर्ण क्षमतेने झाला.  

Back to top button