कोल्हापुरात नवीन नियमावली लागू; काय सुरु, काय बंद | पुढारी

कोल्हापुरात नवीन नियमावली लागू; काय सुरु, काय बंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ; जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या निर्बंधांमध्ये सोमवारपासून काही प्रमाणात शिथिलता मिळणार आहे. सध्या सुरू असलेली अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवारपासून सकाळी ७ ते ४ या कालावधीत सुरू राहणार आहेत. सुरू असेलेल्या उद्योगांसह ज्या उद्योगांमध्ये कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे उद्योग ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. याचबरोबर हॉटेल रेस्टॉरंटमधून होम डिलिवरीसह पार्सल सुविधाही सुरू राहतील. 

अधिक वाचा : राज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यात येणार!

राज्य शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यांची पाच गटात वर्गवारी केली आहे. त्यानुसार प्रत्येक गटासाठी निर्बंध उठवण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याअंर्तगत पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड संख्या या निकशावर कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश चौथ्या गटात झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी याबाबतचे आदेश काढले. 

चौथा गट   

• अत्यावश्यक सेवा दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू

• सरकारी, खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती

• सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमावरील बंदी कायम

• लग्न समारंभाला 25 लोकांची उपस्थिती

• अंत्ययात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी

• बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार

• शेतीची कामे दुपारी 4 वाजेपर्यंतच

• ई-कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी

• संचारबंदी लागू राहणार • सलून, जिम 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार • बस सेवाही 50 टक्के क्षमतेने

Back to top button