

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात चौकाचौकात अनधिकृत होडिंग, फलेक्स, बॅनरचा बकालपणा वाढला आहे. निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांनी झाडे, बोर्ड, महावितरणचे खांब एवढेच नव्हे तर, सिग्नलची जागा देखील सोडली नाही.
दरम्यान, अशा प्रकारे चमकोगिरीवर लगाम लावण्यासाठी महापालिकने कारवाई सुरु केली असून, तब्बल 17 जणांवर थेट गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यात राजकीय फलेक्स असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वाढदिवस, प्रवेश, स्वागत समारंभ, कार्यक्रम अशा वेगवेगळया कारणांनी फलेक्सद्वारे शहराचे विद्रुपीकरण केेले जात आहे. यावर नियंत्रण राखण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या वर्षात आतापर्यंत 1 लाख 77 हजार 266 फलकांवर कारवाई करून सुमारे 23 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 111 नागरिक, आणि आस्थापनावर ही कारवाई केली आहे.
महापालिकेकडून अशा विनापरवाना फ्लेक्स, बॅनर, किऑक्सवर कारवाई केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर आयुक्त हर्डीकर यांनी अशा जाहिरातींवर कारवाई करण्यास बजावले आहे. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 14 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 1 लाख 77 हजार 266 अनधिकृत होर्डिंग, फलक, किऑक्सवर कारवाई केली आहे.शहर विद्रूप करणार्या 111 व्यावसायिकांसह नागरिकांकडून 23 लाख 19 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान शहरात अनधिकृत जाहिराती लावणार्यांवर आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी म्हणणे आहे.
वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने अशा प्रकारे अनधिकृत फलक, होर्डिंग, किऑक्सवर जाहिराती लावू नये, अशा सचूना होता. यासाठी न्यायालयात याचिका देखील झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व राजकीय पक्षांकडून न्यायालयात अनधिकृत जाहिराती न लावण्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत. परंतु, त्याचे पालन होताना दिसत नाही. पालिका प्रशासनाने अनधिकृत फलक उभारू नयेत आणि कार्यकर्त्यांना तशा सूचना द्याव्यात, असे पत्र सर्वच राजकीय पक्षांच्या शहराध्यक्ष व लोकप्रतिनिधींना दिले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात जवळपास 1 हजार 679 अधिकृत होर्डिंग आहेत. या माध्यमातून पालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. मात्र, शहरात अलीकडच्या काळात अनधिकृत फलेक्स, फलक, बॅनर उभारण्याचे प्रकार वाढत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी देखील आहेत. दरम्यान, अनेक होर्डिंगच्या खाली क्युआर कोड, फलकाची माहिती पाटी नसल्याचे दिसून आली आहे. त्यामुळे असे फलक अनिधकृत ठरवून त्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
महापालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत होर्डिंगवर आपली जाहिरात करावी. क्षेत्रीय कार्यालयानुसार पाहणी करण्यात येत आहे. अनधिकृत फलेक्स आढळल्यास नियमानुसार त्यावर कारवाई सुरु आहे.
राजेश आगळे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका