

पुणेः रविवारच्या गर्दीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा सर्वोच्च प्रदूषित पातळीवर गेली होती. डिसेंबरमधील हवा प्रदूषणाचा उच्चांक नोंदला गेला.
शहरातील हवा प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून, रविवारी शहरातील सर्वंच भागात गर्दी असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. प्रामुख्याने शिवाजी रस्ता गर्दीने फुलून गेला होता. हडपसर, नगर रस्ता, पाषाण, लोहगाव, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर या भागातील हवा प्रदूषणात मोठी वाढ झालेली दिसत होती.
तारीख------------हवेची गुणवत्ता
१ डिसेंबर----------२१६
२ डिसेंबर----------२२८
३ डिसेंबर --------२३६
४ डिसेंबर---------२२९
५ डिसेंबर---------२१४
६ डिसेंबर---------२५०
७ डिसेंबर ---------२७०