Navneet Rana vs Shivsainik : ‘राखीव बंटी बबलीसाठी ॲम्बुलन्स’; शिवसेनेचे कार्यकर्ते राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक
पुढारी ऑनलाईन डेस्क : हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य (नवणीत राणा आणि रवि राणा) आणि शिवसेना आमने-सामने (Navneet Rana vs Shivsainik ) आले आहेत. शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले. तर राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठणावर ठाम आहेत. येथे कोण येत असेल तर आम्ही त्यांना चांगलाच हिसका दाखवतीलच.असा पावित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. तर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी खार येथील त्यांच्या घराबाहेर ॲम्ब्युलन्स आणली आहे. ही ॲम्बुलन्स चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावरील पाटी सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.
Navneet Rana vs Shivsainik : राखीव बंटी बबलीसाठी ॲम्बुलन्स…
हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. ( Navneet Rana vs Shivsena ) राणा दाम्पत्यांना मातोश्रीकडे जाण्यापासून शिवसैनिकांनी रोखले आहे. शिवसैनिक मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या मांडुन आहेत. राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी राणा दाम्पत्याला अमरावतीपर्यंत पोहोचवण्यासाठी ॲम्बुलन्सची सोय केली आहे. या ॲम्बुलन्सवरील 'राखीव बंटी बबलीसाठी ॲम्बुलन्स' अशी पाटी लावली आहे. ही पाटी उपस्थितांचे लक्ष वेधुन घेत आहेत. मातोश्री निवास्थान परिसरात कोणत्याही परिस्थितीत आम्ही राणा दाम्पत्याला मातोश्री वर येवू देणार नाही, त्यांना पोहचवण्यासाठी ॲम्बुलन्सची सोय केली आहे, अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या आहेत.
राणा दाम्पत्य येताच आम्ही त्यांना महाप्रसाद देऊ, असे म्हणत राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी आज शनिवारी सकाळपासुन मातोश्री बाहेर गर्दी केली. त्यांना घराबाहेर घेरण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. शिवसेना कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
- सोलापूर : चुकीची कारवाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे निलंबित
- मुंबईत हनुमान चालिसा पठणावरून संघर्ष पेटला! शिवसैनिक आक्रमक, राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न
- ६३ मून टेक्नॉलॉजीची संपत्ती जप्त करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्य : सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
- वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार
- बंटी आणि बबली येत असतील तर येऊ देत, संजय राऊतांची राणा दाम्पत्यांवर टीका

