Navneet Rana vs Shivsena : पोलिस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?; नवनीत राणांचा सवाल (Video) | पुढारी

Navneet Rana vs Shivsena : पोलिस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?; नवनीत राणांचा सवाल (Video)

 पुढारी ऑनलाईन डेस्क : हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्‍पत्‍य आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. ( Navneet Rana vs Shivsena ) राणा दाम्पत्यांना मातोश्रीकडे जाण्यापासून शिवसैनिकांनी रोखले आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडून राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी घरातूनच फेसबुक लाईव्ह करत शिवसेनेवर त्‍यांनी निशाणा साधला. त्‍या म्‍हणाल्‍या ” एका आमदार आणि खासदाराला घरात बंद केले त्याचे कारण काय?. आम्हाला बंद केले पण इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक बाहेर आले त्यांना का रोखले नाही. बॅरिकेडिंग तोडून गेटच्या आत येण्यापर्यंत त्यांना कोणी ताकद दिली?”.

Navneet Rana vs Shivsena : शिवसैनिकांना विरोध का केला जात नाही

आम्हाला विरोध केला जात आहे. आम्ही हत्यार घेवुन आलेलो नाही. मग का रोखता आम्हाला?  शिवसैनिकांना विरोध का केला जात नाही. त्यांना कसे येवु दिले. पोलिस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत खा. नवनीत राणा यांनी फेसबूक लाईव्ह केले. सरकार महागाई, वीजबीलावर का बोलत नाहीत. असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राणा दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. मुंबईतील खारमधील आपल्‍या निवासस्थानी ते गेले. मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाला शिवसैनिकांनी प्रचंड विरोध करत मातोश्री निवासस्थानासमोर ठाण मांडुन आहेत. तर राणा दाम्पत्यही आपल्या मतावर ठाम आहेत. राणा दाम्पत्याने आपल्या खारमधील आपल्या निवासस्थानी पूजाही केली.

हेही वाचलतं का? 

 

Back to top button