

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर यंदा संसदेचे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
देशात इंधनाचे वाढलेले दर, शेतकरी आंदोलन तसेच महागाईमुळे होरपळलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न जोपर्यंत सोडवले जाणार नाही. तोपर्यंत सदनाचे कामकाज चालू देणार नसल्याचा सूचक इशारा अकाली दलाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर दिला आहे.
अधिक वाचा
शेती सुधारणा कायद्याविरोधात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या हरसिमरत कौर यांनी बैठकीनंतर इशारा दिला. त्या म्हणाल्या की, शेतकरी आंदोलन एक मोठा मुद्दा आहे. लवकरात लवकर या मुद्दयाचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबत सर्व पक्षांनी बैठकीत मत व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांचे प्रश्नांचे निराकरण केल्यानंतरच सदनाचे कामकाज चालेल.
येत्या २२ जुलैला २०० आंदोलक संसदेत जातील, अशी माहिती शेतकरी नेते भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी दिली. शेतकऱ्यांचा मुद्दा सदनात मांडण्याची विनंती देखील विरोधी पक्षांकडे केल्याचे टिकेत म्हणाले.
या अनुषंगाने दिल्ली पोलिसांनी सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळासोबत बैठक घेतली. पोलीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. पावसाळी अधिवेशना दरम्यान शेतकरी आंदोलन संसदेजवळ शेतकरी संसद भरवतील. यासंबंधीची परवानगी दिल्ली पोलिसांकडून मिळेल, असा विश्वास शेतकरी नेते दर्शन पाल यांनी व्यक्त केला.
हे ही वाचलं का?
पाहा PHOTOS : [visual_portfolio id="7577"]