Whatsapp Monitoring: रेड, ३ ब्लू टिक... सरकार तुमचे Whatsapp कॉल ऐकतंय... हा मेसेज तुम्हालाही आलाय? जाणून घ्या यामागचं सत्य

Whatsapp Monitoring
Whatsapp Monitoringpudhari
Published on
Updated on

Whatsapp Monitoring Message: WhatsApp वापरणाऱ्या देशातील करोडो लोकांना काही दिवसांपासून एक मेसेज येत आहे. हा मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की भारत सरकारने व्हॉट्स अॅपचे नवे मॉनिटरिंग नियम लागू केले आहेत. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की आता युजर्सचे कॉल आणि पर्सनल मेसेजवर नजर ठेवली जात आहे. काही खास टिक मिळाल्यानंतर सकारला तुमच्या संभाषणाची माहिती मिळत आहे. काही मेसेजमध्ये या कॉल आणि मेसेजच्या आधारावर युजरविरूद्ध कारवाई देखील केली जाऊ शकते.

Whatsapp Monitoring
WhatsApp status controversy Dhule: वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून दोंडाईच्या मध्ये दोन गटात दगडफेक, 3 पोलीस जखमी, जमावाविरूद्ध गुन्हा दाखल

व्हॉट्स अॅप मॉनिटरिंग गाईडलाईन

मात्र व्हायरल होणाऱ्या या मेसेजमधील दाव्याची पोल खोल PIB Fact Check ने केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा संदेश फेक असल्याचे सांगितलं. सरकारकडून कोणतेही व्हॉट्स अॅप मॉनिटरिंग गाईडलाईन प्रसिद्ध केलेली नाही असं स्पष्ट करण्यात आले आहे.

Whatsapp Monitoring
CJP Protest Death Fact Check: लाठीचार्जमधील जखमी मुलीचा खरंच मृत्यू झाला का? दिल्ली पोलिसांनी स्पष्टच सांगितलं

पीआयबी फॅक्ट चेकने २९ ऑगस्ट रोजी या व्हायरल दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने वॉट्स अॅपशी निगडीत मॉनिटरिंग बाबत कोणतीही गाईडलाईन प्रसिद्ध केलेली नाही. याचा अर्थ व्हॉट्स अॅपबाबत व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत असलेला मेसेज म्हणजे सरकारी आदेश नाहीये. युजर्सनी हा मेसेज सत्य मानून तो फॉरवर्ड करून नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Whatsapp Monitoring
Brain Monitoring Device | मेंदूची स्थिती सांगणारे छोटे डिव्हाईस ‘टेम्पल’

रेड टिक आणि ३ ब्लू टिकचा दावा

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये एका गोष्टीकडं सर्व लोकांचे लक्ष वेधले गेले. यात व्हॉट्स अॅपवर वेगवेगळ्या रंगाची टिक अन् सरकारची पाळत याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या मेसेजमध्ये कथितरित्या वॉट्स अॅपवर जास्त ब्लू टिक किंवा रेड टिक दिसली तर याचा अर्थ सरकारने हा मेसेज पाहिला आहे. त्यावर कारवाई होऊ शकते. हा दावा फसवा असून पीआयबीच्या फॅक्ट चेकनुसार व्हॉट्स अॅप टिकला सरकारच्या कथित मॉनिटरिंग सिस्टमशी जोडण्याबाबत कोणतंही तथ्य नाहीये.

Whatsapp Monitoring
Monitor Lizard Rescue |औरवाड येथे घरात सापडली घोरपड; नैसर्गिक आधिवासात केले मुक्त

सरकार व्हॉट्स अॅप कॉल रेकॉर्ड करतंय?

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे की तुमचे व्हॉट्स अॅप कॉल देखील रेकॉर्ड केला जात आहेत. असा दावा करणारे अनेक फेक मेसेज यापूर्वी देखील व्हायरल झाले होते. सध्या व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत फॅक्ट चेक करणाऱ्या एजन्सीने सांगितलं की अशी कोणतीही सरकारी गाईडलाईन जारी झालेली नाही. फक्त व्हायरल मेसेज सत्य मानून सरकार प्रत्येक व्हॉट्स अॅप कॉल रेकॉर्ड करत आहे असे म्हणणे चुकीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news