WhatsApp status controversy Dhule: वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून दोंडाईच्या मध्ये दोन गटात दगडफेक, 3 पोलीस जखमी, जमावाविरूद्ध गुन्हा दाखल

दोंडाई पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू केली
WhatsApp status controversy Dhule: वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून दोंडाईच्या मध्ये दोन गटात दगडफेक, 3 पोलीस जखमी, जमावाविरूद्ध गुन्हा दाखल
Published on
Updated on

धुळे : व्हाट्सअप च्या स्टेटसवर वादग्रस्त संदेश ठेवल्याच्या कारणावरून दोंडाईचा शहरात एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर देखील दगडफेक झाल्याने तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. आता या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

WhatsApp status controversy Dhule: वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून दोंडाईच्या मध्ये दोन गटात दगडफेक, 3 पोलीस जखमी, जमावाविरूद्ध गुन्हा दाखल
Dhule Ganja News: शिरपूरच्या जुनापाणी शिवारात वनजमिनीवर कापसाच्या आड गांजाच्या रोपांची लागवड

दोंडाईचा येथील आईशा मशिदी जवळील गरीब नवाज कॉलनी मध्ये हासिम काकर यांचे राहते घरासमोर ही घटना घडली आहे. हासिम काकर याने दोन दिवसापुर्वी व्हाटसपवर ईद ए मिलाद साजरी करण्यानिमीत्त व इतर ईस्लामीक सण साजरे करण्याची कार्यपददत याबतचा व्हिडीओ स्टेटसला ठेवला. या व्हिडिओवरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

WhatsApp status controversy Dhule: वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून दोंडाईच्या मध्ये दोन गटात दगडफेक, 3 पोलीस जखमी, जमावाविरूद्ध गुन्हा दाखल
Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त

या कारणारुन मुजाहीद बागवाण, आबीद खाटीक (रा. म्हाडसानगर), शाकिब चुडीवाला (रा. साईबाब मंदीराजवळ, दोंडाईचा), जुनेद युसुफ खाटीक, कादीर बागबान (रा. गरीब नवाज कॉलनी), नुर भिका पिंजारी ( रा. गौशीया नगर), समीर (रा. चैनी रोड), रहीम रंगरेज (रा. मुन्नाचौक ), मोईन फिरोज शहा (रा. गरीब नवाज कॉलनी), इम्रान खाटीक (रा. मालपुर चौफुली), जुबेर युनीस पिजारी (रा. इस्लामपुरा), अमिर मुस्ताक मनियार (रा. अशोक नगर), सुफियान रिजवान खान, बबलु खाटीक (रा. गरीब नवाज कॉलनी), आरीफ मेहमुद शहा व इतर १५ ते २० इसम यांनी जमावबंदी कायदयाचे उल्लघन करुन गैरकायदयाची मंडळी जमवुन घोषणाबाजी करत शिवीगाळ सुरू केली. तसेच दमदाटी करुन मोठमोठ्याने घोषणाबाजी केली.

WhatsApp status controversy Dhule: वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून दोंडाईच्या मध्ये दोन गटात दगडफेक, 3 पोलीस जखमी, जमावाविरूद्ध गुन्हा दाखल
Dhule News: धुळे जिल्ह्याचे 21.60 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

हासिम काकर यास घरात कोंबुन ठेवुन घरावर दगडफेक करुन घराच्या खिडकीच्या काचा फोडुन अंगणात लावलेली पल्सर मोटार सायकलची मोडतोड करुन सदर मोटार सायकलला आग लावुन नुकसान केले. दरम्यान वातावरण तणावाचे झाल्याने दोंडाईचा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू केली. यात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अंमलदार राजन दुसाने, हर्षद बागुल, हिरालाल सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले पोलिसांनी मोठ्या शिताफीने तणावाची ही परिस्थिती हाताळली.

WhatsApp status controversy Dhule: वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून दोंडाईच्या मध्ये दोन गटात दगडफेक, 3 पोलीस जखमी, जमावाविरूद्ध गुन्हा दाखल
Dhule News | साक्री जवळील शेवाळी फाटा उड्डाणपुलास अखेर मिळाली मंजुरी; अनेक वर्षांची मागणी मान्य!

या संदर्भात कॉन्स्टेबल प्रशांत अशोक दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पो.स्टे. येथे बी.एन.एस कायदा कलम १०९(१), ११५ (२), ११७(२), ११८(१), १२१(१), १२१(२), १३२, १८९८२), १९१(२०.१९२,२२३,३२४ (४), ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पथकाने आता कायद्याचा भंग करणाऱ्या या आरोपींचा शोध घेऊन अटक सत्र राबवण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news