CJP Protest Death Fact Check: लाठीचार्जमधील जखमी मुलीचा खरंच मृत्यू झाला का? दिल्ली पोलिसांनी स्पष्टच सांगितलं

Delhi Protestor Death Case Facts: दिल्ली पोलिसांनी नुकत्याच केलेल्या घोषणेत नागरिकांना सोशल मीडियावर माहिती शेअर करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला.
Protestor Death Fact-Checks
Protestor Death Fact-Checkspudhari
Published on
Updated on

Delhi CJP Protest Death Fact Check

नवी दिल्ली : 20 जुलै रोजी कॉक्रोज जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये २१ वर्षाची साक्षी ही महिला आंदोलक जबर जखमी झाली होती. या साक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत आता दिल्ली पोलीसांनी खरी माहिती समोर आणली आहे.

दिल्ली पोलिसांनी नुकत्याच केलेल्या घोषणेत नागरिकांना सोशल मीडियावर माहिती शेअर करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत जंतर मंतरवरील लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितलं.

Protestor Death Fact-Checks
CJP Jantar Mantar Protest Support : नीट पेपरफुटीप्रकरणी माळीनगर ते अकलूज निषेध मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्ली पोलीस काय म्हणाले?

दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही इथं सांगू इच्छितो की जखमी झालेली महिला ही जिवंत असून ती सध्या राम मनोहर लोहिया रूग्णालयात दाखल आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचं अन् ती धोक्यातून बाहेर असल्याचं सांगितलं आहे.'

दिल्ली पोलीस आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते की, 'दिल्ली पोलीस नागरिकांना विनंती करते की सोशल मीडियावर माहिती पसरवताना किंवा माहिती पाहताना अतरिक्त काळजी घ्या. तुमच्या पर्यंत पोहोचलेली प्रत्येक माहिती विश्वासार्ह स्रोतांमार्फत तपासली पाहिजे.

Protestor Death Fact-Checks
NEET-UG 2024 Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात संजीव मुखियाला CBI कडून क्लीनचिट

20 जुलैला नेमकं काय झालं होतं?

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षाची साक्षी ही सोमवारी झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झाली होती. त्यानंतर तिला राम मनोहर लोहिया रूग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होत. तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.

हॉस्पिटलच्या बुलेटीनमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, 'तिचा व्हेटिलेटर आता काढून टाकण्यात आला आहे. ती स्वतः श्वास घेत आहे. ती शुद्धीत असून सांगितलेल्या सुचनांना प्रतिसाद देत आहे. तिचा मेंदू आणि मज्जासंस्थेचा एमआरआय स्कॅन हा सामान्य आहे.'

Protestor Death Fact-Checks
CJP Delhi Protest Food Order: बांगलादेश, कतार अन् दुबई... एकाने पाठवले तब्बल २००० पार्सल; जंतर मंतरवर परदेशातूनही ऑर्डर

20 जुलै रोजी काही लोक खाली पडल्यामुळं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. साक्षी याच गर्दीत अडकली असता त्वरित तिला उचलले. दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांनी तिला सीपीआर दिला. त्यावेळी त्यांनी ती गंभीर असल्याचं दिसत होती. ती व्यवस्थित प्रतिक्रिया देत नव्हती. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने तिला रूग्णालयात आणलं होतं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news