कोहिमा : पुढारी ऑनलाईन : देशातील 'या' राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नाही!, असे तुम्हाला सांगितले तर क्षणभर तुमचा
विश्वास बसणार नाही. मात्र देशातील एका राज्यात आता विरोधी पक्ष अस्तित्वात नाही, हे आता वास्तवात उतरले आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्वात नाही, या प्रस्तावावर सर्वपक्षीयांनी शिक्कामाेर्तब केले आहे.
लोकशाही सद्ढ राहण्यासाठी सत्ताधारी पक्षांएवढेच विरोधी पक्षालाही महत्त्व असतं. मात्र ईशान्य भारतातील नागालँड हे राज्यात आता नवा इतिहास घडत आहे. नागालँड राज्यामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात असणार नाही. सर्वंच राजकीय पक्षांनी आता एकत्रीत येत संयुक्त लोकशाही आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वपक्षीय सरकारमुळे नागालँडमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात असणार नाही. राज्यातील सरकार हे संयुक्त लोकशाही आघाडी सरकार म्हणून ओळखले जाईल. यामध्ये भाजपचाही समावेश असणार आहे.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बेठक झाली. यावेळी राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नसेल, या प्रस्तावावर सर्वपक्षीयांची संमती झाली. यानंतर नेफियू रियो यांनी ट्विट करत राज्यात आता संयुक्त लोकशाही आघाडी सरकार कामकाज पहिले. या सरकारमध्ये एनडीपीपी, भाजप, एनपीएफ आणि अपक्ष आमदारांचा सहभाग असेल, असे त्यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात माहिती देताना नागालँड सरकारचे प्रवक्ते नीबा क्रोनू यांनी सांगितले की, आम्ही यासंदर्भात लवकरच विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवणार आहोत. राज्यातील संयुक्त आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील मुख्य विरोधी पक्ष नागा पीपल्स फ्रंटने ( एनपीएफ) कोणात्याही अटीविना सर्वपक्षीय सरकार स्थापन व्हावे, असा प्रस्ताव विधासनभेत ठेवला.
राज्यातील नागा समुदायाच्या विविध प्रश्नी तोडगा काढण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. एनडीपीपीने या प्रस्तावाचे स्वागत केले होते.
या प्रस्तावास सुरुवातीला भाजपने विरोध केला.
मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संयुक्त लोकशाही आघाडी सरकारचे महत्व पटवून देण्यात मुख्यमंत्री रियो यशस्वी ठरले.
यानंतर भाजपनेही रियो यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचलं का ?