RSS : “आरएसएस मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल नाही” | पुढारी

RSS : "आरएसएस मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल नाही"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारवर स्वयंसेवक संघाचे (RSS) नियंत्रण असल्याचे चित्र मीडियामध्ये केले जाते. ते पूर्णतः चुकीचे आहे. आमचे कार्यकर्ते नक्कीच सरकारचा भाग आहेत. मात्र, संघ सरकारचा रिमोट कंट्रोल नाही”, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.

हिमाचल प्रदेश येथे धर्मशाळेमध्ये माजी सैनिकांशी संवाद साधताना भागवत (RSS) यांनी मत मांडले. भागवत पुढे म्हणाले की, “सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतंही आश्वासन देत नाही. सरकारकडून तुम्हाला काय मिळाले, असे लोक विचारतात. त्यावर माझं उत्तर असं आहे की, आपल्याकडे जे आहे ते गमवावेसुद्धा लागू शकते. जगाला आपले अनुसरण करायचे आहे. आज हिंदुस्तान महासत्ता नसेलही पण कोरोना महामारी नंतरच्या काळात विश्वगुरू नक्कीच बनू शकतो.”

यावेळी मोहन भागवतांनी असेही सांगितले की, “सर्व हिंदुस्तानी लोकांचा डीएनए एकच आहे. ४० हजार वर्षांपूर्वीपासून हिंदुस्तानातील सर्व लोकांचा डीएनए आजच्या काळातील लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्यात पूर्वजांच्या बलिदानामुळे आणि त्यागामुळे देश भरभरटीला आहे. आपली संस्कृती टिकून राहिली”, असे मत त्यांनी मांडले.

चित्रकूट येथे नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय हिंदू एकता महाकुंभमध्ये सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, “भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू”, असे सांगत भागवत यांनी हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना घरवापसी करण्याचे आवाहन केले.

हे वाचलंत का? 

Back to top button