श्रीनगरमध्ये पोलीसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद | पुढारी

श्रीनगरमध्ये पोलीसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन

श्रीनगरमध्ये पोलीसांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत १४ जवान जखमी झाले असून २ जवान शहीद झाले आहेत. दोन ते तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

दरम्यान, सर्व जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना ठेचण्यसाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सशस्त्र पोलिस बटालियनजवळ बसवर जोरदार गोळीबार केला. अतिरेक्यांनी एका अतिसुरक्षित भागात बसवर जोरदार गोळीबार केला जेथे विविध सुरक्षा दलांचे अनेक तळ आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी पांथा चौक परिसरातील घडली. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Back to top button