अकोला विधानपरिषद निवडणूक : "कोण जिंकणार" याकडे सर्वांचे लक्ष, मतमोजणीला सुरुवात - पुढारी

अकोला विधानपरिषद निवडणूक : "कोण जिंकणार" याकडे सर्वांचे लक्ष, मतमोजणीला सुरुवात

अकोला; पुढारी वृत्तसेवा

अकोला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक मतमोजणी आज मंगळवार, 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झाली. महाविकास आघाडीचे गोपीकिसन बाजोरिया आणि भारतीय जनता पार्टीचे वसंत खंडेलवाल यांच्यात तुल्यबळ लढत असल्याने कोण विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी आशा आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्हयातील मतसंघातील 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदान केले. त्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा तिन्ही जिल्ह्यातील मतदारांसोबतच नागरिकांना देखील आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील शासकीय गोदामात मतमोजणी सुरु आहे. याठिकाणी 5 टेबलची व्यवस्था आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीने आणली रंगत

शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य या नात्याने गेली अठरा वर्षे गोपीकिसन बाजोरिया या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे समीकरण बदलले. त्यामुळे भाजपने उद्योगपती वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बाजोरिया आणि खंडेलवाल यांच्यात तुल्यबळ लढत झाली. आता मंगळवारी काय निकाल लागतो ही उत्सूकता ताणली गेली आहे. बाजोरिया पुन्हा चमत्कार दाखवतात की खंडेलवाल त्यांची विजयी घोडदौड थांबवतात याकडेही लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Back to top button