बिपीन रावत जिवंत होते, हळू आवाजात..; बचाव पथकातील व्यक्तीने सांगितले…

बिपीन रावत
बिपीन रावत

कुन्नूर, पुढारी ऑनलाईन : तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातानंतर सीडीएस जनरल #बिपीन रावत हे जिवंत होते. त्यांनी हळू आवाजात आपले नाव सांगितले. ते अतिशय गंभीर जखमी होते, असे बचाव पथकातील एका व्यक्तीने सांगितले. एनसी मुरली असे बचाव पथकातील व्यक्तीचे नाव आहे.

काल दुपारी १२. ४० मिनिटांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. त्यापैकी १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. एक अधिकारी गंभीर अवस्थेत सापडला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रावत यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत याही होत्या. त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

घनदाट जंगलात रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यामुळे बराच वेळ बचावकार्यात अडथळे येत होते. काही बचाव पथके वाट काढत घटनास्थळापर्यंत पोहोचली. त्यापैकी एकाने सांगितले की, आम्ही दोन जिवंत लोकांना तेथून बाहेर काढले. त्यात रावत यांचा समावेश होता. त्यांनी हळू आवाजाता आपले नाव सांगितले. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

अन्य एक अधिकारी कोण होते हे मला माहीत नाही. सीडीएस जनरल #बिपीन रावत हे घटनास्थळी गंभीर अवस्थेत होते. त्यांच्या शरीराचा खालचा भाग जळाला होता. आम्ही त्यांना बेडशीटमध्ये गुंडाळले आणि रुग्णवाहिकेत नेले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.'

हेलिकॉप्टर पडल्याने त्याला आगीने वेढले होते. जळत्या हेलिकॉप्टरचे ढिगारे विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या इंजिनला नेण्यासाठी रस्ता नव्हता. बचाव पथकाने आसपासच्या घरातून पाणी आणले. तसेच नदीतूनही मोटर लावून पाणी आणून आग विझवली.

बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार 'अपघातस्थळाजवळ मोठी झाडे मोडून पडली होती. कठीण परिस्थितीमुळे बचावकार्यात वेळ लागत होत होता. तेथे १२ जणांचे मृतदेह सापडले, तर दोन जण जिवंत असल्याचे समजले. वाचलेले दोघेही मोठ्या प्रमाणात भाजले होते.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे अधिकारही रावत यांच्यासोबत जखमी अवस्थेत सापडले. कुन्नूरमधील कटेरी येथून १०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. ग्रामस्थांना हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी तेथून गेल्याचा आवाज आला. त्यानंतर काही वेळातच मोठा स्फोट झाला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news