सीडीएस जनरल बिपीन रावत यांना लष्करप्रमुखांकडून श्रद्धांजली | पुढारी

सीडीएस जनरल बिपीन रावत यांना लष्करप्रमुखांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपीन रावत, संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्लूडब्लूए) अध्यक्ष मधुलिका रावत आणि लष्कारचे इतर ११ कर्मचारी यांचा अकाली मृत्यू बद्दल लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे आणि भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.

भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारतीय लष्कराच्या उच्च संरक्षण संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाच्या दूरगामी सुधारणांचा प्रारंभ केला.

देशी बनावटीच्या लष्करी सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यामध्ये आणि भारताच्या संयुक्त थिएटर कमांडचा पाया घालण्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी दिलेला हा वारसा पुढे सुरू राहील आणि पुढील अनेक पिढ्या तो बळकट करतील, अशी भावना लष्कराकडून व्यक्त करण्यात आली आहे.

संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्लूडब्लूए) माजी अध्यक्ष आणि प्रेरणास्थान असलेल्या मधुलिका रावत यांची अनुपस्थिती सर्वांनाचे मन हेलावून टाकणारी आहे.

सर्वांनाच सदैव उणीव भासेल

त्याचप्रकारे सीडीएस आणि डीडब्लूडब्लूएच्या अध्यक्षांसोबत वेलिंग्टनला जात असलेल्या लष्कराच्या ११ कर्मचाऱ्यांची सर्वांनाच सदैव उणीव भासेल. त्यांनी सशस्त्र दलाच्या सर्वोत्तम परंपरांनुसार आपले कर्तव्य बजावले, अशी भावना निवेदनाद्वारे लष्कराने व्यक्त केली आहे.

सीडीएस जनरल बिपीन रावत बुधवारी सकाळी दिल्लीतून वायुसेनेच्या विशेष विमानाने सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी सुलूरच्या दिशेने रवाना झाले. सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी ते सुलूर येथे पाहोचले. येथून ११ वाजून ४८ मिनिटांनी ते एमआय-१७ व्ही ५ या हेलिकॉप्टरने वेलिंग्टनला रवाना झाले होते.

वेलिंग्टनमधील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा सुलूरच्या दिशेने रवाला झाले. पंरतु, परततांनाच दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी हेलिकॉप्टर मिसिंग रिपोर्ट आला.

तत्काळ स्थानिक प्रशासनासह लष्कराच्या जवानांनी घटनास्थळ गाठून बचाव कार्य सुरू केले. पंरतु, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ३ फेब्रुवारी २०१५ मध्ये लेफ्टिनेंट जनरल असताना नॉगालॅन्डच्या दीमापूरमध्ये चीता हेलिकॉप्टर दुर्घनााग्रस्त झाले होते. या अपघातातून रावत थोडक्यात बचावले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button