Bipin Rawat : बिपीन रावत यांच्या निधनाने राजकीय दिग्गज हळहळले!

बिपीन रावत
बिपीन रावत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय लष्करातील तिन्ही दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत (Bipin Rawat), त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर 11 जणांचे हेलिकाॅप्टर अपघातात निधन झाले. त्यावर देशातील प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांप्रती सेवंदना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.

देशाने शूर पूत्र गमावला

"जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिकाजी यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पूत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची ४ दशकं नि:स्वार्थ सेवा ही शौर्य आणि पराक्रमाने अधोरेखित होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना." – रामनाथ कोविंद, भारताचे राष्ट्रपती.

बिपीन रावत यांची सेवा भारत विसरणार नाही

"जनरल बिपीन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, त्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन प्रामुख्याने अधोरेखित होते. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. भारताचे पहिले CDS म्हणून, जनरल रावत यांनी संरक्षण सुधारणांसह आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित विविध पैलूंवर काम केले. सैन्यात सेवेचा समृद्ध अनुभव त्यांनी सोबत आणला. त्यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही." – नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले

"तामिळनाडूमध्ये आज झालेल्या एका अत्यंत दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि इतर ११ सशस्त्र दलाच्या जवानांच्या आकस्मिक निधनामुळे खूप दुःख झाले. त्यांच्या अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे." – राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री.

बिपीन रावत हे शूर सैनिकांपैकी एक होते

"देशासाठी एक अतिशय दु:खद दिवस आहे. कारण आम्ही आमचे CDS, जनरल बिपीन रावतजी यांना अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे लष्करातील योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. मला अत्यंत दुःख होत आहे. श्रीमती मधुलिका रावत आणि इतर ११ सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांच्या दु:खद निधनाबद्दलही मी मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबियांसोबत संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. कॅप्टन वरुण सिंग लवकर बरा व्हावे, यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो." – अमित शहा, गृहमंत्री.

कारकिर्द प्रभावी होती

"चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्याबद्दल खूप दुःख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय प्रभावी होती. मागील चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो." – शरद पवार, राष्ट्रवादी काॅंग्रेस नेते.

या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे

"मी जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ही एक अभूतपूर्व दुःखद घटना असून या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक व्यक्त करतो. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे." – राहुल गांधी, काॅंग्रेस नेते.

मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे

"भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते. पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे." – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news