स्वाती मालीवाल हल्ला प्रकरणः बिभव कुमारांच्या न्यायालयीन कोठडीत २२ जूनपर्यंत वाढ | पुढारी

स्वाती मालीवाल हल्ला प्रकरणः बिभव कुमारांच्या न्यायालयीन कोठडीत २२ जूनपर्यंत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्‍वाती मालीवाल हल्‍ला प्रकरणातील संशयित आरोपी बिभव कुमार यांच्‍या न्‍यायालयीन कोठीडत आज (दि.१५) दिल्‍लीतील तीस हजारी न्‍यायालयाने २२ जूनपर्यंत वाढ केली आहे. बिभव कुमार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.दरम्यान, तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारच्या दोन जामीन अर्जही फेटाळले आहेत.

स्‍वाती मालीवाल हल्‍ला प्रकरणी बिभव कुमार यांना १ जून रोजी १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली होती. आज त्‍यांच्‍या आज त्याच्या न्यायालयीन कोठडीचा शेवटचा दिवस होता. आज पुन्‍हा त्‍यांना न्‍यायालयात हजर केले असता २२ जूनर्पंयत न्‍यायालयीन कोठडीत वाढ करण्‍यात आली आहे.

स्‍वाती मालीवाल हल्‍ला प्रकरणी १८ मे रोजी बिभव कुमार यांना दिल्‍ली पोलिसांनी अटक केली होती. २७ मे रोजी त्‍यांन जामिनासाठी याचिका दाखल केली. त्‍यानंतर गुरुवार १३ जून रोजी आणखी एक जामीन याचिका दाखल केली होती. ती फेटाळण्‍यात आली आहे. दोन्ही याचिका फेटाळल्यानंतर कुमार यांनी नियमित याचिका मागण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काय घडलं हाेतं?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्यावर आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. मेलवाल यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार, त्‍या १३ मे रोजी सकाळी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेल्‍या होत्‍या. त्‍यावेळी बिभव कुमार आणि यांच्यात वाद झाला. यानंतर बिभव कुमार यांनी त्‍यांना मारहाण केली. ‘छाती, पोट आणि ओटीपोटावर लाथ मारली. तसेच जीवे मारण्‍याचीही धमकी दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्यासाठी विशेष तपास पथमाची ( एसआयटी )स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सीएम हाऊसमधून इतर कागदपत्रांसह डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केले होते आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते.

 

Back to top button