Heavy rainfall | पुढील ४ ते ५ दिवस ‘या’ राज्यांत अति मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी

Heavy rainfall | पुढील ४ ते ५ दिवस 'या' राज्यांत अति मुसळधार पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील ४ ते ५ दिवसांत भारतातील उप-हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात या राज्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

मान्सूनच्या वाटचालीसाठी पुढील ४ ते ५ दिवस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काळात महाराष्ट्रातील आणखी काही भाग, छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा उपसागर, गंगेचा काही भाग, पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि बिहारच्या काही भागांमध्ये मान्सून (Heavy rainfalR) प्रगती करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Back to top button