आंध्रमधील ‘या’ गावात लोक करतात दोनदा मतदान | पुढारी

आंध्रमधील ‘या’ गावात लोक करतात दोनदा मतदान

कोटिया- आंध्र प्रदेश : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजले असून, यातील पहिला टप्पादेखील पार पडला आहे. सर्वत्र निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. सर्व जण आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक आहेत. लोक आपल्या मतदार संघातील काम करणार्‍या आणि आवडणार्‍या उमेदवाराला मतदान करण्यासाठी पुढे येतात. मात्र, असे एक गाव आहे, जिथे एकदा नाही तर दोनदा लोक मतदान करतात आणि त्याला रीतसर मान्यतादेखील आहे.

लोक दोनदा मतदान करतात, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये असे एक गाव आहे, जेथे लोक खरंच दोनदा मतदान करतात. यामागचं कारणदेखील तितकेच मजेशीर आहे. ओडिसाच्या सीमेवर असलेल्या कोटिया गावातील लोक दोनदा मतदान करतात. आंध्र प्रदेश आणि ओडिसा यांच्यामध्ये बर्‍याच काळापासून वाद आहे. 1968 मध्ये कोटिया विवाद समोर आला, जेव्हा तेथील लोकांनी ओडिसाच्या आदिवासी गावांवर दावा केला. हा वाद सुटला नाही आणि त्यामुळे लोक दोन्ही राज्यांसाठी मतदान करतात. प्रत्येक व्यक्ती दोनदा मतदान करतो. तेथील लोकांसाठी डबल वोटर आयडी बर्‍याच अर्थानं फायदेशीर आहे, असे तेथील स्थानिक नागरिक सांगतात.

Back to top button