Lok Sabha Election Dates : लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता | पुढारी

Lok Sabha Election Dates : लोकसभा निवडणुकीच्या तारखा 'या' दिवशी जाहीर होण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले अनेक दिवसांपासून संपूर्ण देभभरात लोकसभेच्या तारखांबाबत चर्चा आहे. आज या तारखांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.  केंद्रशासित प्रदेशात कधी निवडणुका घेता येतील याचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार या कालावधीत जम्मू-काश्मीरला भेट देईल. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी किंवा शुक्रवारी याबाबत घोषणा होऊ शकते. Lok Sabha Election Dates

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासित प्रदेशात (UT) विधानसभा निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आयोगाचा जम्मू आणि काश्मीरचा दौरा होणार आहे. त्यानंतर केंद्राने पॅनेलला केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबत घेता येतील का याचे मूल्यांकन करण्यास सांगितले होते. त्यामुळे याबाबत अधिक माहिती घेतली असता, “एकदा मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बुधवारी भेट संपल्यानंतर आयोग गुरुवारी किंवा शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकेल,” असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button