मध्य प्रदेशातील दतिया येथे भाविकांनी भरलेल्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात, पाच ठार, १५ हून अधिक जखमी

ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटून ५ जण ठार
ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटून ५ जण ठार

दतिया (मध्य प्रदेश) ; पुढारी ऑनलाईन मध्य प्रदेशातील दतिया जिल्‍ह्यात आज (शुक्रवार) सकाळी एक भीषण अपघात घडला. ज्‍यामध्ये ५ जणांचा मृत्‍यू झाला तर तब्‍बल १५ जण जखमी झाले आहेत. रतनगढ माता मंदिरात ज्वारी अर्पण करण्यासाठीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाविक ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधून जात होते. यावेळी ट्रॉली उलटून अपघात झाला. दुर्देवाने या अपघातात पाच भाविकांचा मृत्‍यू झाला. तर १५ जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी ग्‍वाल्‍हेर येथील रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिसवार गावातील भाविक अनेक ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ज्वारी अर्पण करण्यासाठी रतनगड माता मंदिरात जात होते. यातील एक ट्रॅक्टर ट्रॉलीचे नियंत्रण सुटून ती पुलावरून खाली पडली. त्यात सुमारे 30 जण होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुली आणि दोन महिलांचा समावेश आहे. यामध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ग्वाल्हेरला उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.

स्‍थानिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गावातील सुमारे दोनशेहून अधिक भाविक वेगवेगळ्या ट्रॅक्‍टर ट्रॉलींमधून रतनगड माता मंदिरात निघाले होते. या दरम्‍यान हा दुर्देवी अपघात घडला. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news