आसामचे मुख्यमंत्री सर्वात भ्रष्ट : राहुल गांधी | पुढारी

आसामचे मुख्यमंत्री सर्वात भ्रष्ट : राहुल गांधी

गुवाहाटी; वृत्तसंस्था : काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी आपली भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी आसाममधील बारपेटा येथून पुढे सुरू केली असून, यावेळी त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री अशी त्यांची संभावना राहुल यांनी केल्यानंतर दोघांतील राजकीय संघर्ष आणखी टोकदार बनला आहे.

बारपेटा येथे स्थानिक जनतेला संबोधित करताना राहुल यांनी भाजपवरही टीका केली. ते म्हणाले, देशात जात आणि धर्माच्या नावाने फूट पाडण्याचे राजकारण भाजप करत आहे. याच्या उलट, काँग्रेसने नेहमीच सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका घेतली आहे. देशातील जनता या सगळ्या गोष्टी पाहत आहे. आमची कोंडी करण्याचा प्रत्येक प्रयत्न आमच्यासाठी फायद्याचा ठरेल, असा दावाही त्यांनी केला.

खर्गे यांचे गृहमंत्री शहा यांना पत्र

दरम्यान, राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. 18 जानेवारीला भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल झाल्यानंतर 22 जानेवारीपर्यंत राहुल यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या पाच घटनांचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

Back to top button