यशपाल शर्मा : १९८३च्या विश्वचषकात क्रिकेटविश्वाला दाखवली होती ‘ही’ जादू! | पुढारी

यशपाल शर्मा : १९८३च्या विश्वचषकात क्रिकेटविश्वाला दाखवली होती 'ही' जादू!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज, मंगळवारी दिल्लीत निधन झाले. त्यांची वयाच्या ६६व्या वर्षी प्राणज्योत मालवली. यशपाल शर्मा हे १९८३च्या विश्वविजेता भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

अधिक वाचा :

यशपाल शर्मा यांच्या निधनाचे वृत्त कळताच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी दुःख व्यक्त केले आहे. १९८३च्या विश्वचषक स्पर्धेत यशपाल यांची खेळी महत्वाची ठरली होती. त्यांनी विश्वचषक स्पर्धेत ३४.२८ च्या सरासरीने २४० धावा केल्या होत्या.

इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी ६० धावा केल्या होत्या. पंजाबमधील असलेले यशपाल हे मधल्या फळीतील खेळाडू होते. त्यांच्या निधनानंतर कपिल देव यांना अश्रू रोखता आले नाहीत.

अधिक वाचा :

  1. माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन; कपिल देव भावूक
  2. पप्पू वाडेकर खून प्रकरणी दोघे जेरबंद, पुणे पोलिसांची कारवाई

१९७९ ते १९८३ दरम्यानच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी ३७ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी १,६०६ धावा केल्या. त्यात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. यशपाल यांनी इंग्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता.

शालेय जीवनातील एका क्रिकेट सामन्यात ते चर्चेत आले. पंजाब विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या शालेय क्रिकेट सामन्यात त्यांनी २६० धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुढच्या दोन वर्षांत त्यांना राज्य संघ तसेच नॉर्थ झोन टीममध्ये स्थान मिळाले. त्यावेळी त्यांनी विझ्झी ट्रॉफी जिंकली.

अधिक वाचा : 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुलीप करंडकाच्या सामन्यात त्यांनी १७३ धावांची खेळी केली होती. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही निभावली होती.

पंजाब, हरियाणा आणि रेल्वेकडून त्यांनी रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यात त्यांनी १६० सामने खेळले. रणजीमध्ये त्यांच्या नावावर ८,९३३ धावा आहेत. त्यात २१ शतकांचा समावेश आहे.

महिलांच्या एकदिवशीय सामन्यांत त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. उत्तर प्रदेश रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

त्यांच्या निधनाने क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ८० म्हैशींचा सांभाळ करत ती करतेय M.sc चा अभ्यास 

Back to top button