Rajasthan Accident: राजस्‍थानमध्‍ये भीषण अपघातात ११ प्रवाशांचा होरपळून मृत्‍यू | पुढारी

Rajasthan Accident: राजस्‍थानमध्‍ये भीषण अपघातात ११ प्रवाशांचा होरपळून मृत्‍यू

जोधपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्‍थानमधील बाडमेर येथे बस आणि टँकरमध्‍ये झालेल्‍या भीषण अपघातात ( Rajasthan Accident)  ११ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. बाडमेर-जोधपूर महामार्गावर आज ( दि. 10 )  ही दुर्घटना घडली. या अपघातात २१ जण जखमी झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

( Rajasthan Accident) टँकर चालकाची चूक ११ जणांच्‍या जीवावर बेतली

या दुर्घटनेबद्‍दल माहिती देताना जिल्‍हा पोलिस अधीक्षक दीपक भार्गव यांनी सांगितले की, एकेरी वाहतुकीमध्‍ये ( वन वे ) टँकर अचानक आला. टँकर आणि खासगी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. धावत्‍या बसला आग लागली. काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. बसमध्‍ये २५ प्रवासी होते. १० जणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर २२ जण जखमी झाले होते. जखमींना तत्‍काळ रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असताना आणखी एका प्रवाशाचा मृत्‍यू झाला.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक खोळबंली होती. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्‍यक्‍त केले आहे. मृतांच्‍या कुटुंबीयांना ५०-५० हजार रुपयांची मदतही जाहीर केली आहे. राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांनी जखमींवर योग्‍य उपचाराच्‍या सूचना बाडमेर जिल्‍हाधिकार्‍यांना केल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button