विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांशी संबंध असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचा खेळ सुरू होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना प्रत्त्युत्तर दिले आहे . (devendra fadanvis vs malik) मलिक यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचचं ट्विट केलं आहे.
नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देण्यासाठी फडणवीस यांनी एका सुविचाराचा आधार घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करत बनावट नोटांचे रॅकेट चालवले. नोटबंदीनंतर हे रॅकेट चालविणाऱ्यांना अभय दिले. तसेच त्यांच्या काळात कुख्यांत गुंडांना काही महामंडळांचे अध्यक्ष बनविले. दाऊदच्या हस्तकांशी त्यांचा थेट संबंध होता. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात या हस्तकाला थेट प्रवेश दिला, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज ( दि. १० ) पत्रकार परिषदेत केला हाेता.
समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी १४ वर्षांपासून मुंबईत नियुक्तीला आहे.तो सातत्याने सोयीच्या पोस्टवर काम कसे करतो याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे, त्यांना वाचविण्यासाठी हे आरोप होत आहेत, असेही मलिक म्हणाले हाेते.