Malala and Asser : कोण आहे मलाला युसुफझाईचा पती असर मलिक? | पुढारी

Malala and Asser : कोण आहे मलाला युसुफझाईचा पती असर मलिक?

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

नोबेल शांतता पुरस्‍कार विजेती मलाला युसुफझाई ( Malala and Asser ) ही विवाहबंधनात अडकली आहे. बर्मिंगहॅममध्‍ये एक साध्‍या समारंभात तिने असर मलिक याच्‍यासोबत लग्‍न केले. सोशल मीडियावर पोस्‍ट करुन मलालाने याची माहिती दिली. जाणून घेवूया मलालाचा पती असर मलिकविषयी…

( Malala and Asser ) असर मलिक ‘पीसीबी’चा जनरल मॅनेजर

असरने लिंकडीन या सोशल नेटवर्किंगवर दिलेल्‍या माहितीनुसार, असर मलिक हा क्रीडा जगताशी संबंधित आहे. तो मे २०२०पासून पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डचा ( पीसीबी) जनरल मॅनेजर आहे. त्‍याने आपल्‍या इंस्टाग्राम अकाउंट क्रिकेट स्‍पर्धा आयोजनासंदर्भात काही फोटो शेअर केले आहेत.. ‘पीसीबी’साठी काम करण्‍यापूर्वी असर हा खेळाडूंचे व्‍यवस्‍थापन करणार्‍या कंपनीत संचालक होता. तसेच क्रिकेट लीग लास्‍ट मॅन स्‍टँड या संघाचा मालक होता. पाकिस्‍तानमधील तळागाळ्यातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी उपलब्‍ध करुन
देण्‍याचे त्‍याचा मानस आहे.,

लाहौर विद्‍यापीठातून २००८ ते २०१२ या काळात असरने अर्थशास्‍त्र आणि विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मलाला ही क्रिकेटची चाहती आहे. अनेकवेळा तिने याचा उल्‍लेखही केला आहे. यापूर्वीही मलाला आणि असर मलिक हे लंडन येथे २३ जून २०१९ रोजी पाकिस्‍तान विरुद्‍ध दक्षिण आफ्रिका सामना पाहण्‍यासाठी आले होते.

हेही वाचलं का?

Back to top button