Bengaluru Fire : बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; १४ जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

Bengaluru Fire : बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; १४ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: बेंगळुरू-होसूर महामार्गावरील फटाक्यांच्या गोदामाला काल (दि. ७) संध्याकाळी भीषण आग लागली. या आग दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटक डीजीपी आलोक मोहन यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Bengaluru Fire)

कर्नाटकचे डीजीपी आलोक मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या फटाक्याच्या गोदामात ३५ लोक काम करत होते. या आगीच्या दुर्घटनेत १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात मालकासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये आणखी ५ संशयित आरोपी आहेत, त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल. या प्रकरात आम्ही एजन्सींच्या चुकांचाही शोध घेत असून, लवकरच कारवाई करू.  तपासादरम्यान आगीचे कारण कळेल, अशी माहिती देखील कर्नाटक डीजीपींनी दिली आहे. (Bengaluru Fire)

बेंगळुरू-होसूर महामार्गावर अट्टीबेले येथे आज अटीबेले फटाका कारखान्याला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीला पाहून आजूबाजूच्या परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर या दुकानामध्ये फटाके भरलेले होते. आजच्या भीषण दुर्घटनेने हा संपूर्ण परिसर हादरला आहे. (Bengaluru Fire)

हेही वाचा:

Back to top button