WhatsAppने भारतातील ७४ लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदी; तुमच्याकडूनही चूक होतेय का? | पुढारी

WhatsAppने भारतातील ७४ लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदी; तुमच्याकडूनही चूक होतेय का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटाचे लोकप्रिय चॅटिंग अॅप WhatsApp ने आयटी नियम २०२१ अंतर्गत भारतातील ७४ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत व्हॉट्सअॅपकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीकडून ७४ लाख २० हजार ७४८ खात्यांवर बंदी घातली आहे. यापैकी सुमारे ३५ लाख ६ हजार ९०५ खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी प्रतिबंधित करण्यात आली होती.

संबंधित बातम्या : 

भारतात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. दररोज नवीन घोटाळ्याची प्रकरणे समोर येत असतानाच व्हॉट्सअॅप अशा घोटाळ्यांचे सर्वात मोठे केंद्र बनत आहे. याचे कारण म्हणजे घोटाळेबाज व्हॉट्सअॅप मेसेज किंवा कॉलद्वारे लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करतात. अशा घोटाळेबाजांमुळे व्हॉट्सअॅप आता आपले प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित बनविण्यावर काम करत आहे. तसेच वापरकर्त्यांच्या तक्रारी देखील गांभीर्याने घेत आहे.

व्हॉट्सअॅपकडे १४ हजारांहून अधिक तक्रारी

WhatsApp ला त्याच्या मासिक अनुपालन अहवालानुसार, ऑगस्टमध्ये भारतातून १४ हजार ७६७ तक्रार अहवाल प्राप्त झाले होते. या तक्रारींपैकी एकूण ७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपला तक्रार अपील समितीकडूनही आदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर कंपनीने कारवाई केली आहे. “अॅक्शन्स ऑन अकाउंट्स” हा त्या अहवालांचा संदर्भ घेतो. व्हॉट्सअॅपकडून दर महिन्याला खाती बंद केल्याचा अहवाल महिन्याच्या शेवटी शेअर केला जातो.

हेही वाचा : 

Back to top button