WhatsApp HD Image : आता व्हॉट्सअ‍ॅपला शेअर करता येणार एचडी फोटो; जाणून घ्या नवे फिचर | पुढारी

WhatsApp HD Image : आता व्हॉट्सअ‍ॅपला शेअर करता येणार एचडी फोटो; जाणून घ्या नवे फिचर

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअ‍ॅप हे मेटा कंपनीचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर लॉन्च करत असते. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतीच नवीन फिचरची घोषणा करत युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवर एचडी फोटो (WhatsApp HD Image) फोटो शेअर करता येणार असल्याचे जाहीर केले. यासाठी रोल आउट सुरू असल्याची माहिती झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे. जाणून घ्या काय आहे ते फिचर.

व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फिचरची घोषणा केली, जे वापरकर्त्यांना एचडी गुणवत्तेत फोटो शेअर करण्यास परवानगी देते. व्हॉट्सअ‍ॅप संदेश, ऑडिओ आणि इतर शेअर करण्यासारखेच  एचडी फोटो एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरून संरक्षित केले जातात.

 WhatsApp HD Image : कसा पाठवाल एचडी फोटो

  • जर तुम्हाला कोणालातरी व्हॉट्सअ‍ॅपवरुन एचडी फोटो पाठवायचा असेल तर पुढील स्टेप्स प्रमाणे पाठवा
  • प्रथम व्हॉट्सअ‍ॅप अपडेट नसेल तर  अपडेट करुन घ्या
  • त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचॅट ओपन करा
  • व्हॉट्सअ‍ॅपचॅट ओपन केल्यानंतर फोटो पाठवण्याच्या पर्यायावर टॅप करा
  • त्यानंतर तुम्हाला हवा असलेला फोटो निवडा आणि त्यावर टॅप करा तुम्हाला एचडी हा पर्याय येईल
  • त्यानंतर एचडी वर क्लिक करुन फोटो सेंड करा

हेही वाचा:

Back to top button