चोराच्या उलट्या बोंबा… पाकिस्‍तानने आत्‍मघाती स्‍फोटांचे खापर फोडले भारतावर | पुढारी

चोराच्या उलट्या बोंबा... पाकिस्‍तानने आत्‍मघाती स्‍फोटांचे खापर फोडले भारतावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्‍तानने बलुचिस्तानमध्‍ये शुक्रवारी (दि. २९ सप्‍टेंबर) झालेल्‍या दुहेरी आत्‍मघाती स्‍फोटांचे खापर भारतावर फोडले आहे. या स्‍फोटातील मृतांची संख्‍या ६५ वर गेली आहे.

बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील हंगू येथे २९ सप्‍टेंबर रोजी झालेल्‍या आत्‍मघाती स्‍फोटांमागे भारताची गुप्‍तचर संस्‍था ‘रॉ’चा हात आहे, असा बालिश आरोप पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी केला आहे. मास्तुंग आत्मघाती बॉम्बस्फोटात सामील असलेल्या घटकांवर नागरी, लष्करी आणि इतर सर्व संस्था एकत्रितपणे हल्ला करतील. आत्मघाती हल्ल्यात रॉ सामील आहे. असेही ते म्‍हणाले.

पाकिस्‍तानामधील ‘द डॉन’ न्‍यूजने दहशतवादविरोधी विभागाच्या (सीटीडी) निवेदनाचा हवाला दिलेल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तसेच प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने आपला सहभाग नाकारला आहे. या घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.” असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button