PM Modi WhatsApp : पीएम मोदींशी व्हॉट्सअ‍ॅपवर कनेक्ट राहण्याची संधी; जाणून घ्या अधिक माहिती | पुढारी

PM Modi WhatsApp : पीएम मोदींशी व्हॉट्सअ‍ॅपवर कनेक्ट राहण्याची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टीव्ह आहेत. तुम्ही त्यांना X (पूर्वीचे Twitter), Facebook, Instagram आणि इतर प्लॅटफॉर्मवर फॉलो करू शकता. आता या यादीत व्हॉट्सअॅपचेही नाव जोडले गेले आहे. म्हणजेच तुम्ही पीएम मोदींशी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट होऊ शकता. तुमच्या मनात प्रश्न असेल की त्यांच्या नंबरशिवाय तुम्ही त्यांच्याशी कसे कनेक्ट होऊ शकता?

व्हॉट्सअॅपच्या नवीनतम फीचरच्या मदतीने पीएम मोदींशी व्हॉट्सअपवर कनेक्ट राहता येईल. या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने मागील आठवड्यातच व्हॉट्सअप चॅनेल (WhatsApp Channels) हे नवीन फिचर आणले आहे, जे हळूहळू सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करता येईल.

पीएम मोदींसोबत व्हॉट्सअॅपवर कनेक्ट राहण्यासाठी काय करावं लागेल?

पीएम मोदींशी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट राहण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. व्हॉट्सअॅपवर चॅनल हे नवे फीचर नसेल तर ते अपडेट करावं लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. आता नेहमीच्या Status या ऑप्शन ऐवजी Update चा पर्याय दिसेल. या ठिकाणी क्लिक करताच, चॅनेल दिसू लागतील. त्याचबरोबर Find Channels या पर्यायावर क्लिक करून नरेंद्र मोदी असे लिहावे लागेल. यानंतर स्क्रीनवर पीएम मोदींचे चॅनल दिसेल, या चॅनेलला फॉलो करता येईल. फॉलो करण्यासाठी + हे बटण टॅप करावे लागेल.

हेही वाचा

Back to top button