WhatsApp Channels : व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फिचर! जाणून घ्या काय आहे खास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतासह जगभरातील काेट्यवधी माेबाईल स्मार्ट फाेन युजर्स व्हॉट्सअॅप हे इन्संट मेसेजिंग अॅप वापरतात. कंपनी युजर्ससाठी वेळोवेळी नवीन अपडेट्स आणत असते. आता व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवीन फिचर आणले आले. ते भारतासह १५० देशांमध्ये लॉन्च केले आहे. हे फीचर ‘इंस्टाग्राम’प्रमाणे आहे. व्हॉट्सअॅपचे ‘WhatsApp Channels’ हे भन्नाट फीचर भारतीय यूजर्ससाठीही उपलब्ध असल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे. (WhatsApp Channels)
व्हॉट्सअॅप चॅनल एक ब्रॉडकास्ट माध्यम
कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपचे ‘WhatsApp Channels’ हे एक ब्रॉडकास्ट माध्यम आहे. या चॅनल फीचरच्या माध्यमातून तुम्ही महत्त्वाच्या, आवडीच्या व्यक्ती, संस्था, निर्माते आणि सेलिब्रिटींना फॉलो करू शकता. यासंबंधित सर्व अपडेट्स तुम्हाला मिळू शकतील. व्हॉट्सअॅप चॅनल्स नावाचे हे एकतर्फी प्रसारण साधन असणार आहे, जे तुमचे कुटुंबीय, मित्र किंवा समुदाय यांच्यासह तुमच्या चॅट्सपासून वेगळे असेल. ही या नवीन फीचरमधील खासियत आहे. (WhatsApp Channels)
WhatsApp मध्ये व्हॉट्सअॅप चॅनेल युजर्संना त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स प्राप्त करण्याचा खासगी मार्ग असेल. आत्तापर्यंत भारतीय क्रिकेट संघ, कॅटरीना कैफ, दिलजीत दोसांझ, अक्षय कुमार, विजय देवरकोंडा यांनी व्हॉट्सअॅप चॅनल सुरू केले आहे. या नवीन फीचरमध्ये अॅडमिन आणि फॉलोअर्स या दोघांचीही वैयक्तिक माहिती सुरक्षित असणार आहे. कोणी कोणाला फॉलो करतं ही माहिती गोपनीय असणार आहे, असेही ‘मेटा’ कंपनीने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
new channel alert 🚨 start channeling katrina kaif https://t.co/hyW6Urth1f pic.twitter.com/iT25kjunHC
— WhatsApp (@WhatsApp) September 14, 2023
WhatsApp Channels: कोणाला ‘व्हॉट्सअॅप चॅनल’ तयार करता येणार
‘WhatsApp Channels’ हे फीचर आता केवळ काही प्रसिद्ध व्यक्ती, संस्था, सिलेब्रेटींना तयार करता येते, मात्र येत्या काही दिवसात सर्वसामान्य व्यक्तीला देखील हे चॅनेल सुरू करण्याची संधी मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मेटा कंपनीने व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर सध्या भारतासह १५० देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात यामध्ये आणखी अपडेट्स होतील, असे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.
सीईओ मार्क झुकरबर्गने शेअर केली FB पोस्ट
‘मेटा’चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचर संबंधी पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, आज आम्ही जागतिक स्तरावर WhatsApp चॅनेल सुरू करत आहोत. अशाचप्रकारची हजारो नवीन WhatsApp चॅनेल जोडत आहोत. जे लोक WhatsApp वर अनेकांना फॉलो करू शकतात. तुम्ही नवीन ‘अपडेट्स’ टॅबमध्ये चॅनल शोधू शकता, असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.