नाशिक : संशयित म्हणून पकडला पण निघाला डॉक्टर ; नेमकं घडलं काय? | पुढारी

नाशिक : संशयित म्हणून पकडला पण निघाला डॉक्टर ; नेमकं घडलं काय?

मनमाड-नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसंस्था

शहरात संशयास्पदरीत्या फिरत गणेश मंडळांचे फोटो घेणाऱ्या तरुणाला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले. परंतु संशयित व्यक्ती डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने मंगळवारी (दि. 19) काही गणेश मंडळांच्या देखाव्यांचे चित्रीकरण करून तो रेल्वेने छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याची माहिती एटीएसला मिळताच त्यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याबाबत सावध केले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी मनमा़ड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता, संबंधित व्यक्ती प्रवास करत असलेली अजिंठा एक्स्प्रेस नगरसूलला रात्री 9.30 च्या सुमारास पोहचणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नगरसूलच्या पोलिसांना याबाबत तत्काळ माहिती देत सतर्क करण्यात आले. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार आणि नगरसूलला रेल्वे पोहोचताच पथकाने संबंधित संशयित तरुणाला ताब्यात घेत मनमाडला शहर पोलिसांच्या हवाली केले. एटीएस पथकाने या तरुणाची कसून चौकशी केली. तसेच त्याच्याकडील सामानही तपासले. त्याच्याकडेे असलेल्या दोन मोबाइलमधील माहिती तपासली असता, त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. चौकशीअंती तो डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button