ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, मासिक पाळीतील पोटदुखी, अशा तक्रारींसाठी बहुतांश वेळा रुग्ण मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन नेहमी उपयोगी पडणार्या गोळ्यांची मागणी करतात. एखादा डोस घेऊन बरे वाटत असल्याने दोन-तीन गोळ्या मागितल्या जातात. मात्र, काही फार्मासिस्ट सुट्या गोळ्या देणे नाकारतात. 'गोळ्यांची पूर्ण स्ट्रिप खरेदी करावी लागेल, आम्हाला स्ट्रिपमधील दोन-तीन गोळ्या देता येत नाहीत,' अशी कारणे सांगतात. मुळात कायमचूर्ण, झंडू बाम अशी काही 'ओव्हर द काउंटर' औषधे वगळता इतर औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यास कायद्याने बंदी आहे.