वीस कोटींमध्ये किती शून्य? डॉक्टर असलेले खासदार म्हणाले… | पुढारी

वीस कोटींमध्ये किती शून्य? डॉक्टर असलेले खासदार म्हणाले...

लखनौ : डॉक्टर असलेल्या खासदाराचे अंकगणित किती कच्चे असू शकते, याची प्रचिती उत्तर प्रदेशात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री जीतन प्रसाद यांनी मंगळवारी इटवाह गावाला भेट दिली, तेव्हा तेथील खासदार डॉ. रामशंकर कथेरिया यांची फिरकी घेण्याची लहर त्यांना आली.

प्रसाद म्हणाले, वीस कोटींमध्ये किती शून्य, याचे उत्तर कथेरिया यांनी दिले तर मी तुमच्या मतदारसंघासाठी लगेच दोनशे कोटींच्या विविध योजनांना मंजुरी देईन. यानंतर क्षणाचाही विलंब न करता कथेरिया म्हणाले, सहा. हे उत्तर अर्थातच चूक होते. त्यानंतर प्रसाद यांना काही क्षण हसू आवरेना. यानंतर त्यांनी एका प्रकल्पाची पायाभरणी केली. अर्थात, कथेरिया यांच्या मतदारसंघासाठी प्रसाद यांनी नेमक्या किती कोटींच्या योजना मंजूर केल्या, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे, कथेरिया यांनी यापूर्वी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button