भारताला नडलेले कॅनडाचे पंतप्रधान पुन्‍हा वादाच्‍या भाेवर्‍यात! संसदेत काय घडलं? | पुढारी

भारताला नडलेले कॅनडाचे पंतप्रधान पुन्‍हा वादाच्‍या भाेवर्‍यात! संसदेत काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅनडामध्‍ये आश्रय घेतलेल्‍या खलिस्‍तानी दहशतवादी निज्‍जरच्‍या हत्‍या प्रकरणी भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ( Justin Trudeau ) पुन्‍हा एकदा वादाच्‍या भोवर्‍यात सापडले आहेत. आता त्‍यांनी चक्‍क नाझीची भालमण केली आहे. ही कृती अत्‍यंत चुकीची आहे, असा आक्षेप कॅनडातील विरोधी पक्षनेते पियरे पॉलीव्‍हेरे यांनी घेतला. तसेच या प्रकरणी ट्रूडो यांनी तत्‍काळ माफी मागावी, अशी मागणी केली. यानंतर कॅनडा संसदेतील हाऊस स्पीकर यांनी ज्‍यूं समुदायाची माफी मागितली आहे.

कॅनडा संसदेत नेमकं काय घडलं?

युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की यांनी शुक्रवार २२ सप्‍टेंबर रोजी कॅनडा दौरा केला. यावेळी त्‍यांनी कॅनडाच्‍या संसदेला संबोधित केले. यावेळी स्पीकर अँथनी रोटा यांनी ९८ वर्षीय यारोस्लाव हुंका यांच्याकडे लक्ष वेधले. तेव्हा उपस्‍थित खासदारांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. स्‍पीकर रोटा यांनी हुंका यांचे वर्णन ‘फर्स्ट युक्रेनियन डिव्हिजन’साठी लढणारा युद्धनायक म्हणून केला. त्यानंतर त्यावर जोरदार टीका झाली. या संपूर्ण घटनेनंतर कॅनडातील ज्यू संघटनांनी रविवारी पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

पंतप्रधान ट्रूडोंनी माफी मागावी

कॅनडाच्या संसदेने हिटलरच्‍या नाझी सैन्यात सेवा केलेल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ज्यू आणि इतरांच्या सामूहिक हत्येसाठी दोषी ठरलेल्या एका युक्रेनियन व्‍यक्‍तीला उभे राहून अभिवादन केले. ही कृती अत्‍यंत चुकीची आहे, असा आक्षेप घेतया प्रकरणी ट्रूडो यांनी तत्‍काळ माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते पियरे पॉलीव्‍हेरे यांनी केली.

हाऊस ऑफ कॉमन्सचे स्पीकर अँथनी रोटा यांनी म्‍हटले आहे की, ” या व्यक्तीबद्दल आपल्याला फारशी माहिती नव्हती. मला अधिक माहिती मिळाल्यामुळे माझ्या निर्णयाबद्दल पश्चाताप झाला, मी ज्यू समुदायांची आणि देशातील ज्यूंची माफी मागतो.”

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button