

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत पार पडेल, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज दिली. सुटीचे दिवस वगळता संसदेचे पावसाळी अधिवेशन कामकाज १९ दिवस चालेल, असेही ते म्हणाले.
कोरोना प्रतिबंधन नियमावलीचे पालन करुनच अधिवेशनाचे कामकाज चालेल.
खासदारांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही. मात्र ज्या सदस्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही त्यांनी चाचणी करुनच सभागृहात प्रवेश करावा, असे आवाहनही लोकसभा अध्यक्षांनी केले.
अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची टक्केवारी ५ पेक्षाही अधिक आहे. त्यामुळे खासदारांसाठी आरटीपीसीआर चाचणी सेवा २४ तास उपलब्ध असेल. आतापर्यंत ३११ खासदारांचे दोन कोरोना प्रतिबंधक डोस पूर्ण झाले आहेत. तर २३ खासदारांनी लस घेतलेली नाही. खासदारांच्या कर्मचार्यांसाठीही लस व्यवस्था करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पावसाळी अधिवेशनापूर्वी १८ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा
२०२२मधील अधिवेशन संसदेच्या नवीन इमारतीमध्ये
कोरोना महामारी काळात संसदेची तीन अधिवेशनने झाली आहेत. यामध्ये खासदारांशी उपस्थिती लक्षणीय होती. नवीन संसदेचे कामकाज ऑक्टोबर २०२१पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. २०२२मधील संसदेचे अधिवेशन नवीन इमारतीमध्येच होईल, असा विश्वासही ओम बिर्ला यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज हे सकाळी ११ ते सायंकाळी ६पर्यंत चालेल.
या अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक मांडली जाणार आहेत.शेतकर्यांचे नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर गेली सात महिने आंदोलन सुरु आहे. या प्रश्नी पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.
हेही वाचलं का?