Jagdish Tytler: जगदीश टायटलर यांच्याविरोधात एमपी-एलएलए न्यायालयात चालणार खटला | पुढारी

Jagdish Tytler: जगदीश टायटलर यांच्याविरोधात एमपी-एलएलए न्यायालयात चालणार खटला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  शीखविरोधी दंगल प्रकरणी काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर (Jagdish Tytler)  यांच्याविरोधात दाखल असलेले खटले एमपी-एमएलए न्यायालयात वर्ग करण्यास येथील राउज अव्हेन्यू न्यायालयाने परवानगी दिली आहे. टायटलर यांच्याविरोधात अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यासही मंजुरी मिळाली आहे.

1984 साली शीखविरोधी दंगल उसळली असताना जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप टायटलर (Jagdish Tytler)  यांच्यावर आहे. दिल्लीतील बंगश भागात झालेल्या दंगलप्रकरणी अलिकडेच तपास पथकाने टायटलर यांच्या आवाजाचा नमुना घेतला होता. दंगलीची चौकशी करणाऱ्या नानावटी आयोगाच्या अहवालात टायटलर यांचे नाव अग्रक्रमावर होते. बंगश प्रकरणी त्यांच्याविरोधात गेल्या 20 मे रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बंगश भागात एका गुरुद्वाराला आग लावण्यात आली होती. तर तीन लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा 

Back to top button